महात्मा फुले यांचे कार्य वैश्विक -प्रा. गणेश सूर्यवंशी –

0

जळगाव ;- महात्मा फुले यांचे कार्य वैश्विक आहे. त्यामुळे ते वैश्विक तत्वचिंतक, विचारवंत आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक कार्य समजून घेतांना त्यांच्या समकालीन सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे असे प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

मूळजी जेठा महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. सामाजिक शोषणाचे मूळ माणसाच्या अज्ञानात आहे हे ओळखून फुलेंनी शिक्षण क्षेत्रात कार्याची सुरुवात केली. त्यानंतर वैचारिक लेखनाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जागृती घडवून आणली. त्यामुळे महात्मा फुले यांचे कार्य इतरांच्या तुलनेत वेगळे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

महात्मा फुलेंच्या लेखनाचे संदर्भ देत त्यांनी फुलेंच्या लेखनाची पृथगात्मता स्पष्ट केली. फुलेंनी केलेले कार्य बहुजन समाजात आजच्या काळात झालेल्या शैक्षणिक प्रगतीत महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कला विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेश तायडे, डॉ. चंद्रमणी लभाणे, प्रा. देवेंद्र इंगळे, प्रा. संजय हिंगोणेकर, प्रा. के.के. वळवी, डॉ. महेश बडवे, डॉ. विद्या पाटील, प्रा. रजनी बोंडे, डॉ. मनोज महाजन, प्रा. अनिल क्षीरसागर,डॉ. लक्ष्मण वाघ, प्रा. विजय लोहार, प्रा. जयेश पाडवी, डॉ. जुगलकिशोर दुबे तसेच कला विद्याशाखेतील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. योगेश महाले यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.