Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»महात्मा ज्योतीबा फुले यांनी समाज परिवर्तनाचे क्रांतीकारी कार्य केले
    महाराष्ट्र

    महात्मा ज्योतीबा फुले यांनी समाज परिवर्तनाचे क्रांतीकारी कार्य केले

    By April 12, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामगांव:– महात्मा ज्योतीबा फुले यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवुन क्रांती घडविली. महात्मा फुले हे थोर विचारवंत,उत्तम लेखक होते. त्यांनी शेतकरी व शेतकरी वर्गाच्या हिताकरीता बहुमूल्य लिखाण करुन समाजातुन अंधश्रध्दा व अनिष्ठ चालीरिती नष्ट करुन समाज परिवर्तनाचे क्रांतीकारी कार्य केले.त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून प्रत्येकाने जीवनात त्यांचा अंगीकार करुन उज्वल राष्ट्र घडविण्यासाठी कार्य करावे  असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.दि.11 एप्रिल 2021 रोजी थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.

    यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,शेगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,नगरसेवक किशोरआप्पा भोसले,नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ,खामगांव विधानसभा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मंगेश इंगळे,एनएसयुआयचे शहर अध्यक्ष रोहित राजपुत,सुटाळा खु.चे सरपंच निलेश देशमुख,उपसरपंय जयेश वावगे,वाडीचे सरपंच विनोद मिरगे,गोंधनापूरचे सरपंच मधुकर वेरुळकर,विदर्भ हौशी कबड्री.चे अध्यक्ष अशोकबाप्पु देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेउन काॅंग्रेस कार्यकत्यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये पक्ष संघटन अधिक मजबुत करुन जनतेच्या सेवेसाठी तत्पर रहावे.सध्या राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा दुर करण्यासाठी महात्मा फुले, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीपासून 1 मे पर्यंत काॅंग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करुन मतदार संघातून जवळपास 500 बाॅटल रक्त संकलन करण्याचा निर्धार करण्यात आला असून रक्तदानाच्या या विधायक कार्यात प्रत्येक गावातील काॅंग्रेस कार्यकत्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करुन इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन त्यांनी केले.

    याप्रसंगी नगरसेवक किशोरआप्पा भोसले यांनी विचार मांडतांना सांगितले की, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महामानवांची जयंती व त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

    सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा  यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर उपस्थितांनी सुध्दा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. जयंतीनिमित्त उपस्थितांना लाडुचे वितरण करण्यात आले.यावेळी महात्मा ज्योतीबा फुलेंचा विजय असो, जय ज्योती-जय क्रांती,अमर रहे,अमर रहे महात्मा ज्योतीबा फुले अमर रहे अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाला शांताराम करांगळे,धनंजय वानखडे सुरेश भोपळे, दिनेश इंगळे, अनंता धामोडे, जितेंद्र देशमुख, अनंता गावंडे, सुटाळा येथील ग्राम पंचायत सदस्य प्रमोदसिंग राजपुत,अरुण डोंगरे, पंकज डोंगरे, सुरेश भोपळे, गोपाल कळींगकर, अमोल इंगळे, राजुभाउ सुलताने, राजुभाउ खंडारे, अनंता धामोळे, मनिष भोपळे यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif