महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त भाजयुमो तर्फे कापडी पिशवी व मास्क वाटप

0

अमळनेर | प्रतिनिधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त “प्लास्टिक मुक्त भारत अभियान” भाजयुमो तर्फे कापडी पिशव्या आणि मास्क वाटप.”महात्मा गांधी मनात असायला हवेत त्यांचे आचार विचार अंमलात आणणे गरजेचे आहे.”महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे कोणताही बदल करायचा असेल तर त्याची सुरवात स्वतःपासून करायला हवी.याच उक्तीप्रमाणे ‘प्लॅस्टिक मुक्त अमळनेर अभियान’ राबविण्यात आले.महात्मा गांधी यांच्या १५१ जयंतीनिमित्त ”सद्धभावना मिशन” अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजपा युवा मोर्चा अमळनेर तर्फे करण्यात आले होते.त्यात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस भाजपा कार्यालयात अमळनेर येथे माल्यार्पण करण्यात आले नंतर त्याचाच एक भाग म्हणून ‘प्लॅस्टिक मुक्त भारत अभियानांतर्गत’शहरातील मुख्य बाजार पेठेत नागरिकांना कापडी पिशवी वाटप आणि हातगाडीधारक दुकानदारांना मास्क वाटप करून भाजयुमो तर्फे मा.आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला.

महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी अमळनेर शहर व ग्रामीण भाजयुमो यांनी हा संकल्प केला होता. “स्वच्छ भारत मोहिम यशस्वी करत,प्लास्टिकमुक्त अभियानाची नवी सुरुवात ही महात्मा गांधीजींच्या १५१व्या जयंतीनिमित्त देशाची खरी कार्यांजली ठरेल,असे प्रतिपादन मन की बात कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.   “आपल्यातील एकात्म भावनेचे दर्शन घडवून प्रत्येक जण आपापल्या परीने गांधीजींना श्रद्धांजली देण्यासाठी काही ना काही सेवाकार्य करू शकतो.” सर्वांनी महात्मा गांधींच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सेवाकार्य करुन,गांधीजींना कार्यांजली वाहावी,असा आग्रह पंतप्रधान मोदीजी यांनी केला आहे.”एकदाच वापर केल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प प्रत्यक्षात राबवूया,असे आवाहनही पंतप्रधानांनी देशबांधवांना केले.” सदर उपक्रमांतर्गत ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि कोरोना सारख्या महामारीच्या काळात नागरिकांमध्ये जनजागृती आणि आजारात घ्यावयाची काळजी यासंदर्भात यावेळी आवश्यक सूचनांचे सुद्धा आमदार स्मिताताई वाघ यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील, बबलू राजपूत,राहुल पाटील, महेंद्र महाजन,चंद्रकांत कंखरे युवा मोर्चा ताअध्यक्ष शिवाजी राजपूत,योगीराज चव्हाण,पंकज भोई,कल्पेश पाटील,गौरव महाजन,घनश्याम पाटील,राकेश पाटील,राहुल चौधरी,समाधान पाटील,कमलाकर पाटील,सौरभ पाटील,विलास सूर्यवंशी,निखिल पाटील,निनाद जोशी,दीपक पाटील.

Leave A Reply

Your email address will not be published.