जळगाव- विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी भोपळाही फोडणार नाही असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता. हे विधान खोडून काढताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनतेत तीव्र असंतोषाची भावना आहे. शरद पवारांचे राज्यात व जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जागाच काय जामनेरातील जागा त्यांनी राखली तर त्याचे आश्चर्य वाटेल, असा दावा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी व्यासपीठावर युवा नेते अमोल मिटकरी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, ॲड. रविंद्रभैय्या पाटील, भाऊसाहेब पाटील, उमेदवार अभिषेक पाटील, महानगरअध्यक्ष मनोज चौधरी आदी उपस्थित होते.बाकीच्या उद्योगांमुळे महाजनांचे दुर्लक्षपालकमंत्री गिरीश महाजन यांना बाकीचे अनेक उद्योग आहेत. त्यामुळे त्यांनी जळगाव जिल्ह्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यांच्याच जामनेरात अवर्षण आणि बालमृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे. भुसावळच्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था किती बिघडली आहे ते लक्षात येते. जिल्ह्यात चार ठिकाणी गेलो असता रस्त्यांची स्थितीकडे किती दुर्लक्ष झाले आहे. महाजनांकडे जलसिंचन खाते असताना पाडळसरे प्रकल्प अपूर्ण आहे. त्याला केवळ 40 कोटी रुपयेच मिळाले आहेत. तेव्हा चारशे कोटींचे काम आम्ही केले होते. विदर्भ व मराठवाड्यातला अनुशेष त्यांनी पुर्ण केलेला नाही. जळगाव मनपा निवडणुकीत केलेली आश्वासने महाजनांनी पुर्ण केलेली नाहीत. सत्ताधाऱ्यांनी केवळ घोषणाबाजीच केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व जागा येतील असे त्यांना सांगावे लागते यापेक्षा दुसरे काय असू शकते असा सवाल त्यांनी केला. शेतीत अग्रेसर असलेला जिल्हा आता पिछाडीवर आहे. आम्ही एसीत बसून निर्णय घेतले या आरोपावर बोलताना आता गेली पाच वर्षे एसीत कोण बसले आहे? असा सवाल त्यांनी केला.चंद्रकांत पाटील पुरात वाहून आलेलेजिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीनंतर शरद पवारांचे अस्तित्व संपेल असे विधान केले होते. यावर बोलताना चंद्रकांत पाटील हे पुराच्या पाण्यात वाहून आलेले नेते आहेत. त्यांनी एवढ्या ज्येष्ट नेत्याबाबत बोलताना तारतम्य ठेवावयास हवे, असे त्यांचे कान टोचले.मोदी, शहा अणि सीएमना सभा घेण्याची गरज काय?सर्व विरोधकांना पक्षात घेणे, त्यांना इडी लावणे या व्यतिरिक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही जमलेले नाही. विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्नते करत आहे त्याचा परिणाम निवडणुकीनंतर लक्षात येर्इल. शरद पवारांची त्यांना भिती वाटते. इडी मुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. पंतप्रधान नद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शंभर सभा घेण्याची गरज का पडते? विरोधक नसतील तर घरुनच निवडणुक लढवा असे आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले. मेो टेन पेक्षा खाजगीकरण रोखारेल्वेचे बेसीक बजेट मर्ज करण्यात आलेले आहे. रेल्वे व एसटीचे खाजगीकरण करण्यात येत आहे. रेल्वेचा प्रवास हा सामान्यांसाठी सोयीचा व कमी खर्चाचा आहे. मात्र त्याच्या खाजगीकरणामुळे सर्व सामान्यांचा प्रवासही खाजगी लोकांच्या हातात जाणार आहे. एक वेळ बुलेट ेन नाही आली तर चालेल मात्र खाजगीकरण रोखण्याची मागणी त्यांनी केली. देशाची आर्थिक व्यवस्था घसरली असल्याचे त्यांनी सांगितले. बिहार व तेलंगणापेक्षाही महाराष्ट्राचा विकासदर खाली आला असल्याचा दावा त्यांनी केला.बेरोजगार भत्त्यासह अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्याचा दर्जाजयंत पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीसह बरोजगारांना 5 हजार बेरोजगार भत्ता देण्यात येणार असल्याचा जाहीरनामा देत असल्याचे सांगितले. महिलांवर अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बचत गटांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याच्या मालाच्या खरेदी करु त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देवू गेल्या पाच वर्षात राज्याची घसरलेली अर्थव्यवस्था, घसरलेली पत सावरण्याचा जाहीरनामा देत असल्याचे सांगितले.