महागणाऱ्या गॅस सिलिंडरमुळे ‘उज्ज्वला’ योजनेला गळती !

0

नवी दिल्ली : महागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतींमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी सिलिंडर न भरण्याचा निर्णय घेतला आहे.  उज्ज्वला योजनेंतर्गत ९६ टक्के परिवारांना घरगुती गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सिलिंडरच्या दरात वाढ होत असल्याने पुन्हा स्वयंपाकासाठी ते लाकडांकडे वळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये लाकडाच्या किंमतीत १० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबरपूर्वी लाकडाचे दर घट असतानाच आता दरांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पाहिले असता घरगुती गॅसच्या दरात २५ टक्के वाढ झाली आहे. राजधानी नवी दिल्लीमध्ये सध्या विनाअनुदानित सिलिंडर ८५९ रुपयांना मिळत आहे. हाच सिलिंडर ऑगस्ट २०१९मध्ये ५७५ रुपयांना मिळत होता. केवळ सहा महिन्यांत सिलिंडरच्या दरात २८४ रुपयांची वाढ झाली आहे. सिलिंडरच्या दरात सर्वाधिक वाढ दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळाली आहे. येथे निवडणुकीनंतर सिलिंडरच्या दरात १४५ रुपयांची वाढ झाली. महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणामध्ये निवडणुकीनंतर महिनाभरात घरगुती गॅसच्या दरात ७७ रुपयांची वाढ झाली आहे. ज्याप्रमाणे सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे, त्याचप्रमाणे जळाऊ लाकडाच्या दरातही वाढ होत असल्याने गरीबांची अवस्था बिकट झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.