जळगाव : जिल्ह्यातीलज मीन आणि गौणखनिजाच्या वसूलीत जिल्हा प्रशासनाने उद्दीष्टापेक्षा अधिक वसूली केली आहे. विशेष म्हणजे यंदा वाळू घाटांचे लिलाव झाले नसतांनाही अधिकची वसूली झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. वसूलीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कर्मर्चायांची कौतुक केले आहे.
जळगाव जिल्हा हा महसूलीदृष्ट्या मोठे उत्पन्न देणारा जिल्हा राहीला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्याची सूत्रे स्विकारल्यानंतर वसूलीकडे अधिक लक्ष केंद्रीत केले होते. यंदासाठी जिल्हा प्रशासनाला जमीन आणि गौण खनिजाच्या वसूलीसाठी १४५ कोटी रूपयाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने जमीन आणि गौण खनिजाचे हे उद्दीष्ट पार केले असून मार्च अखेरीस १४७ कोटी ७८ लाख ५६ हजारांची म्हणजेच १०१.४३ टक्के वसूली पूर्ण केली आहे. दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिकचीवसूली झाल्याने जिल्हाधिकारी प्रसाद यांनी महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.
चोपडा- ७३.०६ टक्के, चाळीसगाव- ७६.६३, यावल- ७७.०३, जळगाव ९९, अमळनेर- १०१.२०, रावेर- १०२.७१, पाचोरा- १०२. ८३, धरणगाव- १०२.९७, पारोळा- १०७.१५, एरंडोल- १०८.१७, जामनेर- १०९. २६, भुसावळ- ११०.४९, बोदवड- ११४.६०, भडगाव- १२४.९८ आणि मुक्ताईनगर तालुक्यात १६४.७१ टक्के वसूली झाली आहे.