महसूल विभागाकडून महापालिकेचे बँक खाते बंद

0

जळगाव, प्रतिनिधी । महसूल विभागाने मार्च एंडची कारवाई करत विविध अस्थापानाकडे थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. यात ज्या अस्थापानाकडे थकबाकी आहे अशा अस्थापानाचे बँक खाती गोठविण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी दिले आहेत. यातच महापालिकेकडे जवळपास १३ ते १४ कोटींची महसूलची थकबाकी  असल्याने महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचे आदेश बँकांना उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी दिले आहेत.

 

ही थकबाकी वसूल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी महापालिकेची बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी वृत्तास दुजोरा दिला असून खाते गोठविण्यात आले की नाही हे बँकेने अद्याप कळविले नसल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.