जळगाव :- महानगरपालिका,नगरपालिका क्षेत्रात 29 जानेवारी तसेच 3 मे2019 च्या पत्रानुसार 7व्या वेतन आयोग संदर्भात राज्य शासनाचा अध्यादेश उपसंचालकांकडून पारीत होऊन देखील अंमलबजावणी झालेली नाही. नपा, मनपा क्षेत्रातील कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी जुलै पेड ऑगस्ट पासून करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
शहर मनपा व नगरपालिका क्षेत्रातील कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगाची निश्चिती, अंमलबजावणी आदेश निश्चिती करण्यात आली असून जानेवारी 2016 ते डिसेंबर 18 पर्यतची वेतन थकबाकी अटीशर्तीनुसार पुढील पाच वर्षात कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीत समान हप्त्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जे कर्मचारी सेवेत नाहीत व सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना रोखीने या सातव्या वेतन आयोगातील फरकाची रकम अदा करण्यात येईल. तसेच जुलैऐवजी जानेवारी आणि जुलै अशी दोन वेळा वेतनवाढ होईल, असे निश्चित केलेे आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी अजुनही झालेली नसल्याने वेतन थकबाकी वाढत जाऊ नये, यासाठी जुलै पेड ऑगस्ट वेतनापासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आदोलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे वासुदेव चांगरे, चरणसिंग टाक, जयप्रकाश चांगरे, अरूणकुमार चांगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.