Saturday, October 1, 2022

मलिकांचा आणखी एक बॉम्ब; व्हॉट्सअप चॅट पोस्ट करत म्हणाले..

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील आरोपांची मालिका काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. त्यातच नवाब मलिक आज पुन्हा एकदा ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी नवाब मलिक यांनी के.पी गोसावी आणि एका दिल्लीच्या व्यक्तीच्या संभाषणाचे व्हॉट्सअप चॅटचाच स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे, के. पी गोसावी आणि काशिफ खान यांच्यावर टीका केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी गोसावी आणि एका व्यक्तीमध्ये काशिफ खान संदर्भात झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे.

 

ट्विटमध्ये मलिक म्हणतात की, हे आहे के.पी. गोसावी आणि खबरी यांच्यामध्ये काशिफ खानबद्दल झालेले संभाषणाचे व्हॉट्सअप चॅट. काशिफ खानला प्रश्न का विचेरले जात नाहीत. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यातील संबध काय? असे प्रश्न मलिक यांनी उपस्थित केले आहेत. तसेच व्हॉट्सअप संभाषणाचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी सातत्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. तसेच वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचाही आरोप केला. समीर वानखेडे आणि भाजप यांच्यातील संबधावरही मलिकांनी अनेकदा वक्तव्य केली आहेत.

काशिफ खान कोण आहे 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याआधीही काशिफ खानबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ते यापूर्वी म्हणाले होते की, माझा प्रश्न असा होता की हा दाढीवाला कोण आहे? हा दाढीवाला फॅशन टीव्हीचा भारतातला प्रमुख आहे. हा फॅशनच्या नावाखाली पॉर्नोग्राफी, ड्रग्स आणि सेक्स रॅकेटचा धंदा करतो.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या