जळगाव:- अमृत योजनेअंतर्गत मलनि:स्सारण योजनेच्या कामाचे रू.160 कोटी रकमेच्या कामाचे कार्यादेश महापौर सीमा भोळे यांच्याहस्ते या योजनेचे कामी निविदा मंजूर केलेले मक्तेदार एल सी ईन्फ्रा प्रोजेक्टस प्रा लि.अहमदाबाद, गुजरात यांचे प्रतिनिधी निकेश नाकरानी यांना दि. 21 रोजी देण्यात आले.
यावेळी सभापती स्थायी समिती जितेंद्र मराठे, सभापती महीला व बालकल्याण समिती मंगला चौधरी, उज्वला बेंडाळे, चेतन सनकत स्थायी समिती सदस्य, सुनील भोळे शहर अभियंता, योगेश बोरोले, शाखा अभियंता प्रकल्प हे उपस्थित होते.
सदरचे काम हे पुढील 30 महीन्यात पुर्ण करावयाचे असुन यात कानळदा रोडचा परीसर, इंद्रप्रस्थ नगर, एस. क.े ऑईल मील, खडके चाळ, क्षत्रिय मराठा मंगल कार्यालय परीसर, महावीर जिनिंग फॅक्टरी, संभाजी चौक, अमर चौक उस्मानिया पार्क पर्यन्तचा शिवाजीनगरचा संपुर्ण परीसर, प्रजापत नगर, हरीओम नगर, मोहन थेटर परीसर, कांचन नगर, शनीपेठ, बालाजी पेठ, बळीराम पेठ , शंकरराव नगर, दशरथ नगर, ज्ञानदेव नगर, बहीणाबाई चौधरी जलकुंभ परीसर, संपुर्ण जुने जळगाव परीसर, कालीकामाता चौक परीसर, अजिंठा चौफुली, रॉयल फर्नीचर, मेहरूण परीसर, मेहरूण तलावाचा परीसर, मोहन नगर, आरटीओ ऑफीसचा रस्ता, काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र चौक, कोर्ट चौक, रेल्वे स्टेशन या सीमेतील भागांचा समावेश आहे.