Wednesday, February 1, 2023

मलकापूर येथे शांतता समितीची बैठक संपन्न

- Advertisement -

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नवदुर्गा उत्सवानिमित्त मलकापूर पोलीस स्टेशन येथे मा. पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांचे मार्गदर्शनाखाली शांतता समितीच्या बेठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीच्या  अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ हे होते. तर प्रमुख उपस्थितीत तिन्ही पोलीस स्टेशनचे  सर्व सदस्य तसेच दुर्गादेवी मंडळाचे सर्व अध्यक्ष व सदस्य शांतता समितीचे सदस्य बँड आणि टेंट व्यवसायिक उपस्थित होते. या मिटींगमध्ये शासनाने  4 डिसेंबरला दिशानिर्देश दिले आहे.  नवदुर्गा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा कोरोना नियमाचे काटेकोरपणाने पालन करावे, दिशा निर्देशाचे वाचन करण्यात आले. सर्वांना त्याबद्दल अवगत करण्यात आले असून सर्वांनी पुन्हा एकदा आजपर्यंत आपण शहरांमध्ये साध्या पद्धतीने सर्व सण साजरे करण्यात आलेले आहे.  अशाच प्रकारे हा उत्सव सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन कऱण्यात आले आहे.

- Advertisement -

जनतेकडून सुद्धा सर्व सदस्य त्याला एक उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे, यावर्षी ही नवदुर्गा उत्सव सुद्धा सध्या पद्धतीने साजरा करावा आपल्याला काही अडचण असल्यास मलकापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे, आवाहन शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी केले आहे. या बैठकीला सर्व पक्षीय पदाधिकारी व नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे