पारोळा – येथील मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी शहरभर विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले त्यात गाव होळी चौकात छावा संघटनेच्या वतीने शिवाजी महाराजांचा देखावाचा चौथरा उभारणायत आला होता त्यानंतर सकाळी दहा वाजता माजी आमदर आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या हस्ते भव्य मोटर सायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पंचायत समिती सभापती मनोराज पाटील, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, रावसाहेब भोसले संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष आशिष पाटील, दिगंबर पाटील शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानदीप पाटील
रवींद्र पाटील, डॉ योगेंद्र पवार, प्रा जे बी पाटील, राकेश शिंदे,संकेत शिरोळे, प्रमोद पाटील, समाधान पाटील, जितेंद्र पाटील, कौस्तुभ सोनवणे, आदी उपस्थित होते शिवरायांची वेशभूषा पराग पाटील यांनी साकारली होती यावेळी आठशे ते हजार शिवभक्त आपल्या मोटरसायकल्स वर स्वार होऊन रॅलीत सहभागी झाले होते तसेच महिलांचाही प्रतिसाद उत्स्फूर्तपणे होता मोटरसायकल रॅली एन एस हायस्कुल मैदानातून प्रारंभ झाला नंतर कजगाव रस्ता तलाव गल्ली, मोठा महादेव चौक, मोरफळ गल्ली, आझाद चौक, भवानी चौक, आंबेळकर चौक, राम मंदिर चौक, कासार गणपती चौक, गावहोळी चौक नगरपरिषद, बाजारपेठ ,आणि नंतरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला, शिवाजी महाराजांच्या जयघोष करत मोठ्या संख्येने रॅली निघाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूपेंद्र पाटील व शैलेश पाटील यांनी केले