मराठा समाजा विरोधात अपशब्द वापरणाऱ्या श्रावण देवरे निषेर्धात जोडे मारो आंदोलन

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) –  ओ बी सी नेता श्रावण देवरे याने मराठा आरक्षणाला प्रखर विरोध करत मराठ्यांना ओ बी सी मधूनतर नाहीच मात्र सरकारने ई एस बी सीच्या फेकलेल्या  तुकड्यातले  कवडी  ऐवढे आरक्षण सवलती सुध्दा मराठ्यांच्या पदरात पडु देणार नसल्याची भाषा वापरत राजर्षी शाहु महाराज,सयाजीराव गायकवाड,पंजाबराव देशमुख,यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,आण्णासाहेब पाटील या महापुरुष व बहुजन समाजात स्थान असणाऱ्या महान व्यक्ती विषयी खालच्या भाषेत व्यक्तव्य  करून अवमान केल्याने ओ. बी. सी. नेता श्रावण देवरे च्या प्रतिकात्मक फोटो ला चाळीसगाव तहसील कार्यालया समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन दि १४ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.यावेळी श्रावण देवरे च्या विरोधात दिलेल्या घोषणानी परीसर दणादणला.

मराठा आरक्षणा विरोधात मोहीम उघडून  ओ. बी. सी. नेता श्रावण देवरे याने  मराठा समाजा विरोधात अपशब्द वापरून मराठा समाजाला चिथावणी देत मराठ्यांना दिलेले आरक्षण आम्ही पचु देणार नाही.जर त्यांना आरक्षण मिळालेच तर छाताड्यावर बसून नरडीवर  पाय ठेवून  अतड्यात हात घालून  बाहेर काढु अशी गरळ मराठा समाजा विषयी श्रावण देवरे ने ओकल्याने  त्याचा खरा चेहरा समाजा समोर उघडा झाला असून  श्रावण देवरे सह ओ बी सी नेत्यांनी वरवर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचे वरवर दाखविले .मात्र  मराठा आरक्षणा विरोधात चिथावणी खोर भाषा वापरल्याने  मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मराठा समाजाने राज्यभर लाखोंच्या संख्येने शांततेच्या मार्गाने  मोर्चे काढले आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाच्या जवळपास ४२ तरुणांनी आत्मबलीदान दिले त्या त्यागातुन  समाजाला आरक्षण मिळाले .मात्र ते श्रावण देवरे सारख्या जातीवादी लोकांना बघविले नाही. म्हणून त्यांनी  मराठा आरक्षणा बद्दल असलेली भूमिका समोर येवून. थेट मराठ्यांच्या नरटीचा घोट घेण्याची धमकी देत.महापुरुष व बहुजन समाजाच्या हितासाठी योगदान देणाऱ्या जनमानसात स्थान असणाऱ्या नेत्यांच्या विषयी अपशब्द वापरत , मराठा समाजाच्या आरक्षणा विरोधात बेताल वक्तव्य केल्याने दोन समाजा मध्ये दुही निर्माण करणाऱ्या वृत्तीचा चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध केला आहे.श्रावण देवरे याने तात्काळ मराठा समाजाची जाहीर माफी न मागितल्यास श्रावण देवरे या विकृत माणसाला मराठा समाज महाराष्ट्रात फिरु देणार नाही. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास  श्रावण देवरे व शासन,प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा चाळीसगाव मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने देण्यात येवून

चाळीसगाव तहसील कार्यालया समोर दि १४ रोजी सकाळी ११ वाजता मराठा समाजा विरोधात अपशब्द वापरल्याने  श्रावण देवरे च्या प्रतिकात्मक फोटो ला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले,या आंदोलनात गणेश पवार, लक्ष्मण शिरसाठ, अरुण पाटील ,खुशाल मराठे, भाऊसाहेब सोमवंशी, संजय कापसे,योगेश पाटील, छोटू अहिरे ,देवेंद्र पाटील, किशोर पाटील, प्रमोद वाघ ,विलास मराठे ,राहुल पाटील, सुनील निंबाळकर, कुशल देशमुख, मुकुंद पवार, शांतीलाल निकुंभ, सोनू देशमुख, प्रा गोरख वाघ ,दीपक देशमुख ,डॉ अजय पाटील, शरद पवार ,भरत नवले,अविनाश काकडे, त्रिकाल पाटील, तेजस पाटील, विकास पवार, दिनकर कडलग, सुनील पाटील .विजय शितोळे. भैय्यासाहेब पाटील ,संजय पाटील ,बंडू पगार,बाळु पवार यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.