मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळण्याची भीम आर्मी सामाजिक संघटनेची मागणी

0

पारोळा | प्रतिनिधी

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ह्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात तब्बल 53 मोर्चे निघालेत तर काहींनी आपले बलिदान ही दिले आहे  , त्यानंतर ही शासन मराठा आरक्षण निर्णयाविषयी गंभीर दिसत नाही. सामाजिक, आर्थिक, व शैक्षणिक हानी पोहचलेला मराठा समाजाला आरक्षना ची निंतांत गरज आहे.

तरी सदर मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर मिळावे या मागणीसाठी भीम आर्मी सामाजिक संघटना पारोळा तर्फे मा. तहसीलदार साहेब पारोळा यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन देते वेळी भीम आर्मी तालुका प्रमुख जितेंद्र वानखेडे यांच्यासह भगवान सोनवणे, कमलेश सोनवणे, योगेश महाले, सचिन नेतकर, भाऊसाहेब सोनवणे ,सचिन खेडकर,विजय बिऱ्हाडे, मनोहर केदार, सतीश पवार , अनिल सोनवणे ,राकेश कापडणे, विनोदभाऊ पाटील ,भागवत सोनवणे बोदरडेकर, फईम खान अब्बास खान पठाण तर शिव छावा संघटनेचे पदाधिकारी ईश्वर पाटील ,उमेश चौधरी इत्यादी उपस्थित होते . सुनील पवार , प्रशांत पगारे , मोहसीन खान धोंडू लोंढे इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.