मराठा समाजातर्फे शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

भुसावळ (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर व्हावेत व विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण व कला यांना चालना मिळावी याकरिता मराठा समाज भुसावळ व श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव निमित्त सामाजिक उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

स्पर्धा दिनांक १५ फेब्रुवारी या दिवशी भुसावळ मधील शाळांमध्ये घेण्यात येणार आहे.या स्पर्धेतील विषय खालील प्रमाणे आहे निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शोभायात्रेतील रथ सजवणे. निबंध स्पर्धेसाठी २ गट बनवलेले आहे, गट क्रमांक १ इयत्ता पाचवी ते सातवी गट क्रमांक 2 इयत्ता आठवी ते दहावी. गट क्रमांक 1 मधील निबंधाचे विषय- शिवरायांचे बालपण, मला आवडलेल्या शिवरायांच्या बालपणाचा गुण, शिवरायांच्या बालपणाची कथा, बाळ शिवराय व आई जिजाऊ, बालपणातील शिव शिवराय, गड-किल्ले.गट क्रमांक २ निबंध स्पर्धेतील विषय- रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे संघटन कौशल्य, छत्रपती शिवाजी महाराज जीवनातील मला भावलेला प्रसंग, शिवराज्याभिषेक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग, गड-किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम निबंधाची शब्दमर्यादा 900 ते १२०० शब्द आहे .रांगोळी व चित्रकला स्पर्धेतील विषय – छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र, गड किल्ले यांचे चित्र, ऐतिहासिक प्रसंग, रांगोळीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जीवनातील ऐतिहासिक प्रसंग, गड सर करताना चे मावळे, घोड्यावरील लढाऊ छत्रपती शिवाजी महाराज.

स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम,द्वितीय,तृतीय असे पारितोषिक देण्यात येणार आहे.सोबतच भुसावळ शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जिवंत देखावा व त्या काळातील वेशभूषा धारण करून रथ सजवणे व तो सुशोभित करून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. यासंबंधीचे पत्र सर्व शाळांना देण्यात आलेले आहे.

१७ फेब्रुवारी या दिवशी मोफत रक्तगट तपासणी  शिबीर आयोजित करण्यात आलेला आहे .वेळ दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत असुन स्थळ मुन्सिपल हायस्कूल समोर भुसावळ असणार आहे.शिबिर सहाय्यक डॉ.योगेश पाटील तर चौधरी ल्याब मनोज चौधरी राकेश उदासी यांच्या सौजन्याने होणार आहे.तर दिनांक १८ फेब्रुवारी रोजी मोफत डेण्टल चेकअप  शिबीर आयोजन करण्यात आले आहे. वेळ दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत असुन  मुन्सिपल हायस्कूल समोर भुसावळ येथे होणार आहे.शांती डेंटल केअर डॉ तुषार पाटील यांच्या सौजन्याने हे शिबीर होणार आहे.दिनांक 1९ फेब्रुवारी  रोजी छत्रपती चषक कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे असुन सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वेळ असणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भुसावळ स्पोर्ट्स अकॅडमी व जी तोकु काई कराटे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे.  लोणारी समाज मंगल कार्यालय जळगाव रोड येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.

 

दि १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे  शिवजयंतीची रॅली ही सकाळी १० वाजेला छत्रपती शिवाजी महाराज नगर भुसावळ येथून निघणार आहे.

 

दि 19 फेब्रुवारी 2019 रोजी छत्रपती चषक कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ६ विषय छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भुसावळ स्पोर्ट्स अकॅडमी व जी तोकु काई कराटे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली आहे.लोणारी समाज मंगल कार्यालय जळगाव रोड येथे या स्पर्धा होणार आहेत. माहिती साठी प्रमोद अरुण पाटील ८९५६६०६००८, सचिन पाटील ७३०४०१७२१७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन मराठा समाज  अध्यक्ष किरण पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.