मराठा समाजाचे कार्य कौतुकास्पद -नगरसेवक उमेश गुंजाळ

0

27 गुणवंतांचा केला गौरव

पारोळा :- येथील समाज कार्यकारणीने गुणवंत विद्यार्थांना स्फुर्ती देण्यासाठी आयोजित केलेला गुणगौरव समारंभ व मान्यवरांचा सत्कार हा खरोखर कौतुकास्पद उपक्रम आहे.असे गौरवाेद्गार अमरनाथचे नगरसेवक व जळगांव शिवसेनेचे नेते व जिल्हाउपप्रमुख उमेश गुंजाळ यांनी केले.श्री गुंजाळ पुढे म्हणाले की,मराठा समाज हा शेतीप्रधान असुन पारोळा तालुक्यातील समाज ग्रामीण आहे.परंतु बदलत्या काळाबरोबर विद्यार्थ्यानी चांगले गुण मिळवुन यश संपादन केले .त्यांच्या यशकार्यात पालकांचाही तितकाच सिंहाचा वाटा असल्याचे ते म्हणाले.

वाणी मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या गुण गौरव सोहळयात अध्यक्षस्थानी समाजाचे संस्थाध्यक्ष अर्जुन भोसले होते.कार्यक्रमास आनंदराव चौथे जळगांव, कैलास मराठे उद्योजक शिक्रापुर,अशोक थोरात उद्योजक पुणे,विष्णु बाळदे उद्योजक जळगांव,संजय मराठे जळगांव,विनोद मराठे जळगांव,साहेबराव थोरात सर पाचोरा,अशोक थोरात पुणे,अशोक महाडीक पळासखेडे,दिलीप महाडीक पळासखेडे,दिनकर महाडीक सरपंच पळासखेडे,नवनित शिंदे तळोदा,सोपान देवकर नाशिक,पंडीत इंगळे नाशिक,डाँ सतीष देवकर संचालक नुतन मराठा जळगांव,देवा राक्षे जळगांव,सुधाकर जाधव जळगांव,भटु वघारे धुळे,गणेश टकले सुरत,विजय औटे सुरत यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

यावेऴी धर्मराज पवार यांनी समाजाच्या विद्यार्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा व त्याचा उपयोग कसा करावा याबाबत सांगितले तर विद्यार्थांची यशाची ही पहीली पायरी आहे,पालकांनी मुलांना आवडीनुसार शिक्षण द्यावे याबाबत पालकांना डाँ चेतन भोसले(मुंबई) यांनी मार्गदर्शन केले.

सुत्रसंचालन प्रा साहेबराव थोरात यांनी केले. तर कार्यक्रमास विशेष सहकार्य श्री भुपेंद्र मराठे यांचे व कै डाँ आशाताई फाउंडेशन चे अध्यक्ष प्रतिक मराठे व सदस्यांचे लाभले.यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्रावण मराठे,उपाध्यक्ष संजय मराठे,सचिव संतोष मराठे,सदस्य कार्यकारणी आत्माराम भोसले,गणेश खाडे,विनोद साठे,सुनिल मराठे,गोविंदा ढेंगे,पंकज खाडे,कैलास मराठे,आबा मराठे,लक्ष्मण पाथरे,महेश भोसले व साहेबराव खाडे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.