मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचा राष्ट्रवादीला पाठिंबा

0
17

पंढरपूर : विधानसभा निवडणुकांसाठी राज्य सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने बहुजन विचाराच्या राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

मराठा आरक्षण प्रश्नावर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने भाजप सरकारविरोधात राज्यभरात रान उठवले होते. लोकसभा निवडणुकीतही सकल मराठा समाजाने भाजप-शिवसेनेला विरोध केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज्यातील सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपुरातील श्रीराम मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी ही घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here