भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव येथे मराठा आरक्षणाचा चा मुद्दा उपस्थित झाला असून मराठा आरक्षण टिकऊ न शकल्याने, समाज बांधव संतप्त झाले आहे . मराठा समाजाचे आरक्षण सुरक्षित करावे यासह आदी मागण्यासाठी आज दि १७ रोजी सायंकाळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन मराठा समाज बांधवांनी शासनास विविध मागण्यांसाठी निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. भडगाव तहसील कडून नायब तहसीलदार रमेश देवकर व पोलीस प्रशासना कडून पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले.
नीवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या सईबीएस मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपूर्द करतांना जो स्थगिती आदेश दिला आहे. त्यामुळे काल मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे घटना तन्यांचा व कायदेविषयक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर बाब अवलंबित करावी . व मराठा आरक्षण खंडित होऊ न देता पूर्ववत चालू ठेवावी .
कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशी सुनावली आहे. उच्च न्यायालयात खटला लवकरच चालविण्यासाठी न्यायालयाला विनंती करणे, एसइबीसी प्रवर्गातील घटकांना व विद्यार्थ्यांना ज्या सवलती आहेत त्या सुरू ठेवाव्यात, राज्य लोकसेवा आयोगाने एसइबीसी प्रवर्गाच्या ज्या निवड जाहीर केल्या होत्या त्या संरक्षित कराव्यात, सारथी संस्था ठप्प करण्यात आली असून तिला भारगोस आर्थिक निधी द्यावा.
आणासाहेब आर्थिक विकास महामंडळ च्या कोट्यत वाढ करून मिळावी, या वर्षी शासनाने बजेट मध्ये तरतूदच केली नाही . या योजनेला आर्थिक बळ देऊन योजना नव्याने जोरात सुरू करावी. यासह अनेक अकरा मागण्या निवेदनातुन करण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रशांत पवार, कल्याण पाटील, प्रदीप देसले, विजय भोसले, अविनाश देशमुख, सौरभ देशमुख, तुषार देशमुख, योजना पाटील, राजेश पाटील, आदींच्या सह्या यांच्या सह्या आहे. मागण्या मान्य न झाल्यास समाजाला तीव्र आंदोलन करावे लागेल त्यास शासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे .