पाचोरा (प्रतिनिधी) : दि. २० एप्रिल सोमवारी दुपारी बारा वाजता नगरदेवळा ता. पाचोरा पासून बारा किलोमीटर वर असलेल्या दिघी येथील औरंगाबाद व जळगाव जिल्ह्याला जोडणाऱ्या सिमेला जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे तथा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी भेट देऊन सिमेची प्रत्यक्ष पाहणी केली.
याप्रसंगी दोन्ही अधिकाऱ्यांनी कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन व जिल्हा बंदी बाबत सीमेवर कार्यरत पोलीस व महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना शासनाने आखून दिलेल्या नियमा प्रमाणे काम करण्याच्या सूचना व आदेश दिलेत. तसेच जिल्हा बंदीच्या आदेशाचे काटेकोर पणे पालन करण्याचे सांगितले. तसेच बिनतारी यंत्रणा सिमेवर लवकरच बसवली जाईल असे ही त्यांनी यावेळी सांगितले. पोलिस कर्मचाऱ्यां कडून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पोलिस उप अधिक्षक ईश्वर कातकाडे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, उपविभागीय अधिकारी कचरे पाटील, मंडळ अधिकारी साळुंखे, महसूल कर्मचारी, नगरदेवळा दुरक्षेत्राचे सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.