मयत अनोळखी वृध्द महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

0

जामनेर :– येथील राजमोती काॅम्पलेक्सच्या परीसरात दि.१ एप्रिल २०१९ रोजी दुपारी ४ – ४५ वाजेच्या सुमारास ६५ वर्षीय वृध्द महिला मृत स्थितित आढळून आली होती. त्यानतंर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपजिल्हा रूग्णालयातील डॉ.वैशाली चांदा यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर २० / २०१९ प्रमाणे नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.आर.माळी करीत आहे.
मृत महिलेच्या अंगात लाल रंगाचे पातळ त्यावर आकाशी रंगाचे फुले व सोनेरी रंगाचे ब्लाऊज असून उंची १५२ सें.मी.चेहरा गोल,रंग सावळा, शरीर बांधा मध्यम,केस पांढरे, पुढील काही दात पडलेले आहेत.वरील वर्णाच्या महिले विषयी कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ जामनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.