जळगाव, दि. ३-
ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रातकृषी अभियांत्रिकीकरण दिवस साजरा करण्यात येणार असून या निमित्त पेरणीपासून काढणी पर्यंतचे विविध अद्यावत कृषी अवजारांचे प्रदर्शन ४ जून असून सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते होईल. तसेच सन 2019-20 साठीचे कृषी अभियांत्रिकीकरण योजनेचे अर्ज भरून स्वीकारण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.