Thursday, September 29, 2022

ममतादीदींनी कानशिलात मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद: मोदी

- Advertisement -

नवी दिल्ली :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला कानशिलात देऊ इच्छितात. परंतु, तुम्ही दिलेली कानशिलातही माझ्यासाठी आशीर्वादच असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. नरेंद्र मोदींना आपण पंतप्रधान मानत असून त्यांच्या कानशिलात लागवावी वाटते, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. या वादग्रस्त वक्तव्याचा मोदींनी आज समाचार घेतला. मोदी यांनी पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे प्रचार सभा घेतली. त्यात त्यांनी ममता बॅनर्जींवर हल्ला चढवला.

- Advertisement -

तुमची कानशिलातही माझ्यासाठी आशीर्वाद आहे. परंतु, हीच कानशिलात तुम्ही तुमच्या साथीदारांना देण्याची हिम्मत दाखवली असती तर चिटफंड घोटाळा झाला नसता. माँ, माटी आणि मानुषी यांच्या गोष्टी करून सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जींना जनतेशी काही देणेघेणे राहिलेले नाही. ममता बॅनर्जींनी सत्तेच्या नशेत पहिले पश्चिम बंगलला बर्बाद केले. आणि आता सत्ता जाण्याच्या भीतीने उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, दीदी मला पंतप्रधान मानण्यासाठी तयार नाहीत. परंतु, पाकिस्तानच्या पंतप्रधान मानण्यात त्यांना गौरव वाटतो. ममता बॅनर्जी मला पंतप्रधान न मानून संविधानाचा अपमान करत आहेत, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या