मनुर येथील जि.प.शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न

0

बोदवड – तालुक्यातील मनुर बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.६ रोजी बाल मेळावा संपन्न झाला.सदर बाल आनंद मेळाव्यासाठी पाक कलेचे वेगवेगळे मेनू सादर करण्यात आले.त्यात इडली सांबार, खमंग ढोकळे,केक,विविध प्रकारची भेळ,पाणीपुरी,शेंगदाणा चिक्की,तिळचिक्की,कचोरी,पाववडा, चिवडा, समोसा, कांदा पोहे, इत्यादी प्रकारचे साहित्य घरी तयार करून तयार साहित्यांची विक्री विद्यार्थ्यांनी केली.त्यातून त्यांचे जमा खर्च,नफा-तोटा इत्यादींचे ज्ञान प्रत्यक्ष विक्रीतून वृध्दीगत झाले.

या बाल आनंद मेळाव्यात ग्रामस्थ,विद्यार्थी, पालक,ग्रा.प.सदस्य,व अनेक ग्राहकांनी भेट दिली.बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी तब्बल ५७९० रुपयांची विक्री केली व मेळाव्याचा आनंद लुटला.

सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुरवाडे,यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नियोजन केले.मेळावा यशस्वीतेसाठी उपशिक्षक सुनिल पाटील,सौ.भारती पाटील,सौ.भारती खंडेलवाल, श्रीमती मनीषा कचोरे,श्रीमती छाया बहुरुपे,प्रिया खोब्रागडे श्री.योगेश धनगर यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.