मनसे-भाजपची युती? पालघरमध्ये मोदींच्या बॅनरमध्ये राज ठाकरेंचा फोटो

0

मुंबई  : पालघरमध्ये भाजपचे कडवे विरोधक मनसेप्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. ७ जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे. मात्र, वाडा पंचायत समितीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती असल्याने मोदी आणि राज ठाकरे यांचे एकाच बॅनरवर फोटो लागले आहेत.

राज ठाकरे यांनी २०१४मधील निवडणुकीत नरेंद्र मोदींना समर्थन दिले होते. मात्र आगामी काळात त्यांनी आपली भूमिका बदलत लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदी-शहांवर आक्रमकपणे टीका केली. परंतु, सध्या पालघर मधील वाडा तालुक्यात मोदी आणि राज ठाकरे एकाच बॅनरवर दिसून आले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.