मनसे च्या पाठपुराव्याला अखेर यश ; यावल नगरपरिषदतर्फे शहरात स्वच्छता मोहीम सुरू

0

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लिखित तक्रारीची दखल घेत नगर परिषदतर्फे शहरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांची भेट घेवुन दि.२५ मे २०२१ रोजी लिखीत निवेदनाद्वारे शहरातील भुसावळ रोड, सुतारवाडा, फालक नगर, गंगानगर, जे. टी. महाजन व्यापारी संकुल व शहरातील विविध क्षेत्रातील स्वच्छता व नालेसफाई पावसाळ्यापुर्वी नाले साफसफाई पावसाळा तोंडावर आला असला ही सफाई होत नसल्याची तक्रार दिली होती.

जर तात्काळ नगर परिषद शहरात स्वच्छता मोहीम राबविली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने शहरात सफाई अभियान राबवुन यातुन काढलेला घाण व कचरा नगर परिषदे समोर आणुन टाकेल व कचरा फेको आंदोलन करेल असा ईशारा दिला होता.

अखेर मुख्यधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेवुन शहरातील विविध भागात युद्धपातळीवर स्वच्छता कार्यक्रमास सुरूवात केली आहे. नगर परिषद प्रशासनाला नागरीकांच्या समस्या व अडचणी सोडविण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी प्रशासनास जागृत करून शहरातील समस्या सोडविण्याबाबत जागृत केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.