मनसे आमदाराच्या गाडीला अपघात :७५ लाखांच्या कारचा चक्काचूर

0

मुंबई : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या गाडीला गुरुवारी रात्री अपघात झाला. डोंबिवलीत ही दुर्घटना घडली असून गाडीच्या चालकाने वेळीच बाहेर उडी मारल्याने तो बचावला. अपघातात राजू पाटील यांच्या ७५ लाखांच्या आलिशान कारचा चक्काचूर झाला आहे.

बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कारचा ड्रायव्हर पेट्रोल भरुन येत होता. कार पलावा सिटीजवळील रेल्वे उड्डाणपुलावर असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं व भरधाव वेगात असलेली कार थेट खालून जाणाऱ्या कोकण रेल्वे रुळावर कोसळली. सुदैवाने कार चालकाने गाडीतून वेळीच उडी मारल्याने तो बचावला. पण अपघातात महागडया कारचा मात्र चक्काचूर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here