Monday, September 26, 2022

मनवेल येथे महर्षी वाल्मीक जयंती साजरी

- Advertisement -

मनवेल ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

येथे रामायणकार महर्षि वाल्मीक जयंती  विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यलय मनवेल कार्यालयात सरपंच जयसिंग सोनवणे यांच्या  हस्ते आद्य कवी महर्षि वाल्मीक यांच्या  प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

- Advertisement -

महर्षि वाल्मीक चौक येथील बसस्थानक जवळ थोरगव्हाण माजी उपसरपंच समाधान सोनवणे यांच्या  हस्ते महर्षि वाल्मीक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले, तर संदिपभैया सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वढोदा सरपंच संदिपभैया सोनवणे, मनवेल सरपंच जयसिंग सोनवणे, वढोदा येथील नानाभाऊ सोनवणे, पो.पा.विठ्ठल कोळी, सामाजिक  कार्यकर्ता गोविंद पाटील, गणेश कोळी, पत्रकार गोकुळ कोळी, देविदास कोळी, सतीष कोळी, गोकुळ सोनवणे, डीगंबर तायडे, रवींद्र  तायडे, भगवान कोळी आदींसह  ग्रामस्थ उपस्थित होते.

जि.प.प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समीतीचे माजी अध्यक्ष गणेश कोळी, गोकुळ कोळी यांच्या  हस्ते महर्षी  वाल्मीक यांच्या प्रतिमेचे  पुजन करण्यात आले. यावेळी उपशिक्षक सुनिल काळे यांनी रामायणकार महर्षी  वाल्मीक यांचा विषयी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्तविक मुख्यध्यापक ज्योति चौधरी यानी केले आणि  प्रविण पाटील यांनी आभार मानले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या