मनवेल येथील आश्रमशाळा अतिक्रमणाच्या विळख्यात

0

मनवेल ता.यावल (वार्ताहर) मनवेल येथील अनुदानीत आश्रम शाळेच्या उत्तर बाजूला वाँलकंपाऊडचे व पश्चिमेस भोनक   नदीच्या पात्रात  बांधण्यात आलेले संरक्षण भिंतचे  काम अतिक्रमणात असुन ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी तेजभान अरुण  पाटील यांनी केली आहे.

साकळी शिवारात असलेल्या मनवेल येथील आश्रमशाळेचे अध्यक्ष व संचालक यांनी प्रंचड पैशाच्या बळावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असुन या अतिक्रमण मुळे मनवेल येथील नदीच्या काठावर रहीवाशी असलेल्या नागरीकांचे नुकसान व जीवीत हानी होण्याची शक्यता असुन ते त्वरीत काढण्यात यावे अशी तक्रार या जिल्हाधिकारी जळगाव,  प्रांत अधिकारी फैजपुर व यावल तहसिलदार यांचाकडे केलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

मनवेल आश्रमशाळा साकळी शिवारातील गट.न.१५३/१/३ व गट.न.१५३/१ अंतर्गत या जागेवर पश्चिमेस शाळेच्या अध्यक्ष व संचालक यांनी शाषकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.

आदीवासी विकास प्रकल्प कार्यलयातुन स्वच्छ निवृत्त झालेले हुकूमचंद पाटील व मुलगा  ललीत पाटील यांनी मोठ्या टेकडीवर असलेल्या गौणख माती   जे.सी.बी.च्या साह्याने कोरुन नदीच्या बांधण्यात आलेल्या संरक्षण भित लगत टाकून पाण्याच्या प्रवाह आमच्या घराकडे येणार असल्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असुन अतिक्रमणाच्या तात्काळ चौकशी करुन काढण्याची मागणी तेजभान पाटील यांनी केली आहे.

[सन २००६ व २००७ मध्ये भोनक    नदीला मोठा पुर आला होता या पुरात मोठ्या प्रमाणातभ नुकसान झाले होते त्यात साकळी – मनवेल  रस्ता वाहुन गेला होता यांची सार्वजनिक बांधकाम विभागाचा रेकाँडला नोंद असुन भोनक नदीच्या पात्रात करण्यात येत असलेल्या संरक्षण भिंतचे अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.]

(विरोधकांना आमचे वर्चस्व सहन होत नसल्याने खोटे आरोप करतात.आम्ही आमचे हद्दीत संरक्षण भित बाधकाम केलेले आहे. विरोधकांना इतका कडवडा आहे तर परिसरात व गावात किती अतिक्रमन झाले ते पाहावे व  सत्तेचा गैरवापर करून त्यांनी अतिक्रण करून शासनाच्या नीधीतुन  तून स्वतः चे शेतात काम करून घेतले व शेत बिन शेती न करता अनधिकृत बांधकाम केलेले आहे.)

– हुकूमचंद पाटील

अध्यक्ष, अनुदानीत आश्रमशाळा मनवेल

Leave A Reply

Your email address will not be published.