जळगाव :-ता यावल -मनवेल परीसरात वृक्ष तोड करुन त्यापासुन कोळसा तयार केला जात असुन या वर बंदी असली तरी वन विभागाकडुन परवानगी मिळत असल्यामुळे खुलेआम वृक्षतोड होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने कोळसा भट्ट्यावर लेखी आदेश काढून बंदी घातली होती तरी तालुका वनपाल व वन अधिकारी यांनी लेखी परवानगी दिली असल्यामुळे मनवेल ,पथराडे परिसरात भागातील येथे कोळसा भट्ट्या खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे
कोळसा भट्ट्यामुळे बेसुमार वृक्षतोड होते. याशिवाय त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते म्हणून शासनाने कोळसा भट्ट्यांवर बंदी घातली होती परंतु शासनाचा आदेश गुंडाळून ठेवून वन अधिकाऱ्यांनी संगमताने कोळसा भट्टी सुरू करण्यास ३० दिवसाची तात्पुरती परवानगी दिली आहे.एका शेतमालक च्या नावा वर परवानगी काढायची व दुसऱ्या शेतातील झाडे तोड करुन झाडे तोडण्याचा सपाटा सुरु आहे.
मनवेल ,पथराडे कोळसा तयार करून त्याची वाहतूक रात्रीचा वेळी होत आहे शासनाचे निर्बंध असले तरी बांभुळला परवानगी काढण्याची गरज नसल्याने खुलेआम बांभुळ तोड सुरु असल्यामुळे वृक्षप्रेमी मध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शाषन एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा उपक्रम राबविण्यात येत आहे तर दुसरीकडे वृक्षतोड सुरु असल्यामुळे जंगल भकास होत आहे.वृक्षतोड कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी होत आहे.