मनवेल जि.प.शाळेच्या वाँलकंपाऊडचे काम रखडले

0

यावल : मनवेल येथे रोजगार हमी योजने अंतर्गत& जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी रक्कम ११ लाख रुपये मंजूर झाले असुन सहा महिन्या पासुन काम रखडले आहे.

जि.प. शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम रोजगार हमी येजाने अंतर्गत करायचे आहे मात्र , ठेकेदार वयावल प.स.मधील रोजगार हमी योजनेचे अधिकारी यांचा संगममताने कामांसाठी दाखविण्यात येणारे मजुर स्थानिक नसल्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी बोगस काम होत असल्याचे तक्रारी करण्यात आल्यामुळे काम रखडले आहे.

शाळेतील वाँलकंपाऊड साठी खोदण्यात आलेले खड्डे पाहण्यासाठी व जीओ टाँकीन करुन गावातील रोजगार हमी योजनेतुन जाँबकार्ड असलेल्या मजूरांची बँक पासबुक खाते जमा करुन नीधी काढण्यात येत आहे.

रोजगार हमी योजनेतुन काम मंजुर असलेल्या कांमाची गावात दंवडी देवुन स्थानिक मजुरांना प्राधान्य देणे गरजे आहे मात्र स्थानिक मजुरांना मात्रा डावलण्यात येत असुन जे.सी.बी.च्या साह्याने खड्डे खोदून काम बाहेरून आलेले मजुर करीत आहे. शाळेच्या आवारारातील कोणत्याही प्रकारेचे मोजणी हद्द कायम न करता फक्त अंदाजे घाईत काम पूर्ण करण्याचा घाट घातला आहे . रोजगार हमी योजने अंतर्गत गावातील खूप मोठ्या लोकांना रोजगार मिळून खूप मोठा आधार मिळणार आहे परंतु इथे यंत्राच्या सहाय्याने काम करून ग्रामस्थांना अंधारात ठेवण्यात येत आहे.

यावल प.स.विभागाच्या रोजगार हमी योजनेतुन दिड वर्षापूर्वी शोषखड्डे ग्रामस्थांनी तयार करुन पाणी अडवा पाणी जीरवा योजना राबविण्यात आली मात्र शोषखड्डे तयार करुन पाणी जिरविण्यात आले मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवो टाँकीन करण्यात वेळ मिळाला नाही मग शाळेतील कामावर मिळाला कशा असा प्रशन ग्रामस्थांना पडत आहे.

दगडी व मनवेल गावातील अनेक लोकांना शौचखड्याचा अनुदानाची प्रतिक्षा कायम आहे.शाळेतील वाँलकंपाऊडची कामे चांगली व्हावी अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांची आहे.

लवकर कामाला सुरुवात होणार

मनवेल येथील शाळेतील वाँलकंपाऊडचे काम नीधीमुळे रखडले होते. रोजगार हमी योजनेच्या नीधी मजूरांचा खात्यावर दुसरे मस्टर निघाल्यावर कामाला सुरवात करण्यात येईल.

राहुल चौधरी
बांधकाम ठेकेदार

Leave A Reply

Your email address will not be published.