मनवेल आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

मानवेल येथील उज्वल शिक्षण संस्था अमरावती संचलित कै. व्हि. व्हि. तांबट अनुदानित आश्रमशाळेत ७७ विद्यार्थ्यांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात आली.

सिकलसेल आजार संसर्ग जण्य आजार नसून तो अनुवंशी (पिढ्यानपिढी) आजार आहे. तसेच विवाहपूर्वी सिकलसेल आजाराची तपासणी करणे, पती पत्नी दोघेही एस  – ए एस असल्यास बाळाची गर्भजल तपासणी करणे आवश्यक आहे.

एस एस व्यक्ती असल्यास सतत डॉक्टरांच्या सल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. रक्ताची आवश्यकता भासल्यास सिकलसेल व्यक्तींना मोफत सुविधा शासनाकडून दिली जाते. तसेच पीडित व्यक्तीला शासनाकडून 1000 रु महिना दिला जाते. अशी माहिती साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शिरसाड आरोग्य उपकेंद्रांमधील सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अंस्मा प्रविण नमुउद्दीन शेख यांनी दिली.

यावेळी शाळेतील अधिक्षक वंसत पाटील, सारीता तडवी, मुख्यध्यापक संजय अलोणे, सचिन पाटील, शिक्षकतेर कर्मचारी उपस्थित होते. याकामी आशा स्वंयमसेविका रंजना कोळी, पुनम पाटील, ज्योति मोरे यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here