पारोळा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना जळगांव जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जळगांव जिल्ह्यातील पारोळा एरंडोल यावल ह्या तीन तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत सामाजिक अंकेक्षण बाबत जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षखाली निवेदन देण्यात आले.
शासनाने सामाजिक अंकेक्षणाचा कार्यक्रम सप्टेंबर महिन्यात लागु केलेला आहे. तरी सध्या देशासह महाराष्ट्र राज्यात त्यात जळगांव जिल्ह्यात कोरोना महामारीची भयंकर परिस्थिती आहे. जिल्ह्यातील वरील तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी हे सुद्धा कोरोना ग्रस्त आहेत आणि ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक कोरोना महामारीच्या उपाय योजनेत गुंतलेले असुन कामात व्यस्त आहेत. तरी त्यांनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, सध्या ठरलेल्या कालावधीत सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम घेण्यासाठी योग्य वेळ देता येणार नाही त्यामुळे सामाजिक अंकेक्षणाचा कार्यक्रम सफल होणार नाही, त्यासाठी शासनाने माणुसकीचा धर्म दाखवुन काही कालावधी करीता सामाजिक अंकेक्षणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा, सदर कार्यक्रम पुढे नाही ढकलल्यास महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना स्वताच्या आणि कुटुंबांच्या जिवाच्या काळजीसाठी सामाजिक अंकेक्षण कार्यक्रमावर बहिष्कार टाकेल असे निवेदन देण्यात आलेले आहे.निवेदन देतांना संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे, जिल्हा सचिव अतुल पाटील जिल्हा सदस्य खुशाल पाटील बाळु तायडे ईश्वर अडकमोल किशोर कोळी भुषण पाटील मोतीलाल पारधी आदि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.