Monday, September 26, 2022

मनपा मालकीचे धुळखात पडलेले हॉल भाडे तत्वावर द्यावे

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहर मनपा मालकीचे गोलाणी मार्केट मधील धुळखात पडलेले हॉल भाडे तत्वावर उपलब्ध करण्यासाठी आज सेवक सेवाभावी संस्था, हिंदुत्व स्वाभिमान, रिद्धि जान्हवी फाउंडेशन या सामाजिक संस्था व संघटनेच्या वतीने मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

मागील अनेक वर्षापासुन गोलाणी मार्केटमधील धुळखात पडलेले प्रशस्त हॉल ज्याचे विवीध सामाजिक कार्यांसाठी योग्य रितीने उपयोग होऊ शकतो व त्याचा माध्यमातुन जळगाव मनपाला आर्थिक उत्पन्न मिळू शकते, ही बाब लक्षात ठेऊन त्यासाठी सदर हॉलमधे काही सुधारणा करून जळगावकर नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्यास सामाजिक कार्यांसाठी याचा लाभ सामान्य माणसांना होऊ शकतो याची दखल घेण्यात यावी असे, या निवेदनात दिले आहे.

गेल्या अनेक वर्षा पासुन सदर हॉल विना वापर व बंद असल्याने तिथे विघातक प्रवृत्तीचे लोक मद्यपान करतात यामुळे तेथील नागरिकांना त्रासदायक वातावरण निर्माण करून शासकीय मालमत्तेला नुकसान पोहचवण्याचे प्रयत्न करतात असे ही निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी सेवक सेवाभावी संस्था, हिंदुत्व स्वाभिमानचे संस्थापक विशाल शर्मा, जिनल जैन, सुशील अग्रवाल, रिद्धि जान्हवी फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्रलेखा मालपाणी, चेतन कासार तर हिंदुत्व स्वाभिमानचे महासचिव मयुर बारी, उपाध्यक्ष विवेक महाजन, गणेश पाटील, रोहित शर्मा, अमित अग्रवाल यांची उपस्थिती होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या