मनपा निवडणूक ; शिवसेनेच्या शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

0

मनपा निवडणूक ; शिवसेनेच्या शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी, दि. २९ डिसेंबर रोजी शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांनी समर्थकांसह अर्ज सादर केला.

सकाळी ११ वाजेपासूनच इच्छुक उमेदवार पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर दाखल होऊ लागले. विशेषतः दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारांचे आगमन आणि समर्थकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे पालिकेचा परिसर उत्साहाने गजबजलेला दिसत होता.

आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटातील प्रमुख नेत्यांनी आपले अर्ज सादर केले. यामध्ये नितीन लड्ढा ,महानगरप्रमुख संतोष पाटील, सागर सोनवणे, नवनाथ दारकुंडे आणि माजी महापौर विष्णू भंगाळे यांचा समावेश होता. त्यांनी समर्थकांसह पालिकेत प्रवेश करत विजयाची खात्री व्यक्त केली.

माध्यमांशी बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले, “जळगाव महानगरपालिकेची निवडणूक महायुतीच्या पूर्ण ताकदीने लढवली जाणार आहे. भाजप आणि शिवसेनेची युती भक्कम असून, येणाऱ्या निकालात महायुतीचाच झेंडा महापालिकेवर फडकलेला दिसेल. शहराच्या विकासासाठी जनता आमच्या उमेदवारांना भरभरून मते देईल.”असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.