मनपावर केव्हाही बँक खाते सिलची कारवाई

0

डीआरएटी कोर्टाने अपील फेटाळले
जळगाव दि. 22-

हुडकोचे कर्ज प्रकरणी डीआरएटी कोर्टाने महापालिकेचे अपील फेटाळले आहे. त्यामुळे महापालिकेवर बँक खाते सिलची कारवाई केव्हाही होऊ शकते, अशी माहिती स्थायीच्या सभेत मंगळवारी शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी दिली.
महानगरपालिकेच्या कर्ज प्रकरणी डीआरटी कोर्टाने महापालिकेला 341 कोटी रुपयांची डीक्री नोटीस बजावली होती. ती महानगरपालिकेला अमान्य असल्याने नोटीसीविरोधात महापालिकेने डीआरएटी न्यायालयात महापालिकेने अपील केले होते. सदर अपील कोर्टाने सोमवारी फेटाळले आहे. त्यामुळे महापालिकेला 450 कोटी रु. रक्कम देणे लागू आहे. त्यामुळे महानगरपालिकेची बँक खाती केव्हाही सिलची कारवाई होऊ शकते. सदर माहितीमुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.