जळगाव – मनपा आरोग्य विभागाची प्रशासकीय दृष्ट्या डॉ. विकास पाटील व आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या कामाची विभागणी करण्यात आली असून प्रभाग क्र. 1 व 2 चा अतिरिक्त कार्यभार डॉ. विकास पाटील यांच्याकडे तर आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याकडे प्रभाग क्र. 3 व 4 चा पदभार सोपविण्यात आला असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले.
मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्या आदेशावरून डॉ. विकास पाटील यांच्याकडे प्रभाग क्र. 1 व 2 अंतर्गत येणारी आरोग्यविषयक कामे, साफसफाई कामाचे नियोजन, नियंत्रण, पर्यवेक्षण, सार्वजनिक शौचालयांची मक्तेदाराकडून होणार्या नियमित सफाईचे नियंत्रण, स्वच्छता निरिक्षक, आरोग्य निरीक्षक यांच्या कामावर नियंत्रण, प्लॅस्टीक विक्रेत्यांवर कारवाई, जन्म- मृत्यू निबंधक, साथीचे रोग व इतर तत्सम वैद्यकीय क्षेत्रासंबंधी नोंदणी उदा नर्सिंगहोम नोंदणी, नुतनीकरण, व्यवसाय परवाने,एनओसी, मलेरिया विभाग, जीवशास्त्रवेत्ता व अन्न सुरक्षा अधिकारी कामकाज, कत्तलखाना,कोंडवाडा, स्मशानभूमी, बेवारस, प्रेत, मोकाट कुत्रे, निर्बीजीकरण शस्त्रक्रिया इ. जैविक घनकचरा मन्साई बायोमेडिकल वेस्ट सनियंत्रण आदीचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याकडे प्रभाग क्र. 3 व 4 अंतर्गत आरोग्य संबंधी दैनंदिन कामे, आरोग्यविषयक कामे, साफसफाई कामाचे नियोजन, नियंत्रण, पर्यवेक्षण, सार्वजनिक शौचालयांची मक्तेदाराकडून होणार्या नियमित सफाईचे नियंत्रण, स्वच्छता निरिक्षक, आरोग्य निरीक्षक यांच्या कामावर नियंत्रण, प्लॅस्टीक विक्रेत्यांवर कारवाई, स्वच्छ भारत अभियानांतर्गत येणारी सर्व कामे, घनकचरा व्यवस्थापन, सविस्तर प्रकल्प अहवाल अंमलबजावणी, स्वच्छ सर्वेक्षण संबंधी कामकाज,समन्वयाच्या कामकाजावर नियंत्रण, अग्निशमन वाहन व्यवस्था, किरकोळ वाहनदुरुस्ती, घनकचरा प्रक्रिया केंद्र व्यवस्थापन, मलव्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पावर नियंत्रण पर्यवेक्षण, प्रदूषण मंडळाचे कामकाज, पत्र्यव्यवहार, इतर संकीर्ण कामे.