जळगाव ;- येथील निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.वैशाली सुर्यकांत विसपुते यांची मनपाच्या महिला ब्रँड ऍम्बेसेडर (स्वच्छता दूत) पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र जिल्हाधिकारी तथा आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी त्यांना नुकतेच प्रदान केले.
महिलांच्या व किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीविषयी कापडमुक्त अभियान या राबवित असून त्यांच्या फाऊंडेशनतर्फे सार्वजनिक ठिकाणी विनामुल्य सॅनेटरी पॅड वेंडीग मशिन बसविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी त्या वर्षभराच्या प्रकल्पाअंतर्गत महिलांना विनामुल्य सॅनेटरी नॅपकिंग देऊन आरोग्याची काळजी घेत आहे. विसपूते यांनी शहरातील महिलांसाठीच्या सार्वजनिक प्रसाधनगृहे या विषयी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून अनेक वर्ष संघर्ष केला आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय नागरिक स्वच्छता धोरणा अंतर्गत अंमलबजावणी व जनजागृती करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2019 करीता वैशाली विसपूते यांची स्वच्छता दूत म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.