जळगाव :- मनपा प्रशासनाने आर्थिक वर्ष २०१९-२० या वर्षाचा कर भरणाऱ्या नागरिकांना आपल्या बिलामध्ये १० टक्के सूट दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांनी दि.२५ रोजी प्रभाग समिती कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली होती. ३० एप्रिलपर्यंत ही सवलत राहणार आहे. एका दिवसात १ कोटी ३० लाखांचा भरणा झाला आहे.
मनपाने ३० एप्रिलपर्यंत १० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असून, आतापर्यंत उद्दिष्टाच्या ४० टक्के वसुली झाल्याचा अंदाज आहे. मालमत्ता कारवर सूट मिळत असल्याने आणि त्यात केवळ पाच दिवस शिल्लक असल्याने नागरिकांकडून मनपात कर भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.