भुसावळ (प्रतिनिधी)– मध्य रेल्वेने दिनांक १.४.२०२० ते १३.३.२०२१ या कालावधीत विविध क्षेत्रातील गरजा भागविण्यासाठी ५७.९४ दशलक्ष टन मालाची वाहतूक यशस्वीरित्या केली आहे.
मागील ३ महिन्यांत म्हणजे डिसेंबर २०२०, जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१, मध्य रेल्वेने मालवाहतुकीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सातत्याने २% पेक्षा जास्त वाढ साध्य केली आहे.

मध्य रेल्वेने डिसेंबर २०१९ मध्ये केलेल्या ५.७२ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत डिसेंबर २०२० मध्ये ५.८७ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे (२.७२% वाढ); जानेवारी २०२० मध्ये केलेल्या ५.९६ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत जानेवारी २०२१ मध्ये ६.१६ दशलक्ष टन मालवाहतूक (३.४% वाढ) आणि फेब्रुवारी २०२० मध्ये कलेल्या ५.८० दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत फेब्रुवारी २०२१ मध्ये ५.९३ दशलक्ष टन (२.२ % वाढ) मालवाहतूक केली आहे. मध्य रेल्वेने अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी २८.७२ दशलक्ष टन कोळशाचा पुरवठा विविध वीज प्रकल्पांना केला आहे. शेतकर्यांच्या हितासाठी १.५४ दशलक्ष टन धान्य आणि साखर, ३.०७ दशलक्ष टन खते आणि ०.५८ दशलक्ष टन कांद्यांची वाहतूक केली आहे; याशिवाय ४.८२ दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादने; १.७४ दशलक्ष टन लोखंड आणि पोलाद; ५.५२ दशलक्ष टन सिमेंट; ८.९६ दशलक्ष टन कंटेनर वॅगन्स आणि २.९९ दशलक्ष टन डी-ऑईल केक (कडबा) आणि इतर वस्तूंची वाहतूक केली आहे.


