भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेने २३ मार्च २०२० ते १८ नोव्हेंबर २०२० पर्यंतच्या लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधीत ६.७२ लाख वाघिणीद्वारे ३५.५३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी २.६२ लाखांपेक्षा जास्त वाघिणीद्वारे कोळशाची वाहतूक उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वेळेवर वस्तू व मालपुरवठा खात्रीने पोहोचविण्यासाठी, रेल्वेने कोविड १९चे लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत. दि. २३.३.२०२० ते १८.११.२०२० या कालावधीत मध्य रेल्वेने उद्योग क्षेत्राची गरज पूर्ण करीत ३५.५३ दशलक्ष टन मालाची वाहतूक यशस्वीरित्या केली.
वाघिणींच्या बाबतीत दि. २३.३.२०२० ते १८.११.२०२० पर्यंत ६,७२,८७९ इतक्या वाघीणीद्वारे माल वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेने कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर विविध वस्तू वाहून नेणा-या १३,९८१ वस्तूंच्या मालगाड्या चालविल्या. या कालावधी दरम्यान दररोज सरासरी २,७९२ वाघीनींची माल वाहतूक करण्यात आली.
मध्य रेल्वेने उपरोक्त कालावधीत वीजपुरवठा अखंडित व सुरळीत रहावा यासाठी कोळशाच्या २,६२,३२७ वाघिणीची वाहतूक विविध उर्जा प्रकल्पांसाठी करण्यात आली. तसेच अन्नधान्य आणि साखरेच्या ८,८५८ वाघीनींची वाहतूक केली; शेतकर्यांच्या हितासाठी खतांच्या ३१,७४३ वाघिणी आणि कांद्याच्या ७,६१६ वाघिणी ; पेट्रोलियम पदार्थांच्या ६३,३०५ वाघिणी; लोह आणि स्टीलच्या १७,३४९ वाघिणी ; सिमेंटच्या ४५,०३८ वाघिणी ; २,०४,०२१ कंटेनरच्या वाघिणी आणि सुमारे ३२,६२२ वाघिणी डी-ऑईल केक (कडबा) व संकीर्ण वस्तूंच्या वाघिणीची वाहतूक करण्यात आली.