पारोळा (प्रतिनिधी) : शहरातील नॅशनल हायवे वर रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक मधधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने आपल्या ताब्यातील आयशर चालवत असताना रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या सहा वाहनांना धडक दिली त्यात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.
पारोळा शहरातील नॅशनल हायवे क्रमांक सहा वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास बस स्थानक जवळ हिरापूर ता, पारोळा येथील पंकज बाळू पाटील वय २३, गोळू वंसत पाटील वय २१ हे आपल्या मोटरसायकलने क्रंमाक एम एच १९बी एन ६५२२ ने दूध देऊन घरी परत जात असताना समोरून येणाऱ्या मधधुंद अवस्थेतील आयशर चालकाने विरुद्ध बाजुच्या साईडला येऊन गाडीस जोरदार धडक दिली त्यात हे दोन्हीही जबर जखमी झाले. तसेच धडक देऊन या आयशर वाल्यांने पळ काढत पुढे उभे असलेले दीपक ज्ञानेश्वर पाटील यांच्या गाडी (क्रमांक एम एच १९ डी पी २९०९) ला जोरदार धडक दिली व पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भूषण सुभाष चौधरी यांच्या टाटा विस्टा (क्रं, एम एच १९ बी ३६१४), त्याच्या शेजारील ब्रिन्झा (क्र, एम एच १९ सी यू ७८७३) या चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली वाहनात कोणी नसल्याने जीवितहानी टाळली तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ धनजय संजय पाटील (वय २१ रा तरडी ता पारोळा) यांच्या मोटारसायकल (क्रमांक एम एच १९ बी पी ६७९६) हिस ही धडक देऊन चालकास जखमी केले.
याबाबत आयशर चकलाच्या अश्या कृत्य पाहून गावातील काही तरुण कैलास पाटील, प्रकाश पाटील, भूषण चौधरी, समाधान धनगर आदींनी या चालकाचा पाठलाग करत त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. या बाबत जखमींना खाजगी वाहनानाने कुटीर रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारार्थ दोन जणांना धुळे येथे हलवण्यात आले आहे.
या अपघाताचे वृत्त कळताच शहरात बघ्यांची हायवे वर पोलीस स्थानकासमोर गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.

