मद्य साठ्याची तफावत ; अमळनेरातील १५ दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल

0

जळगाव : लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यातील सर्व देशी /विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले असून देखील अमळनेर येथे लॉकडाऊन कालावधीमध्ये विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री झाल्याचे आमदार अनिल पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अमळनेर शहरात तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये अमळनेरात एकूण २५ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात १५ दुकानदाराविरुद्ध मद्य साठा तफावत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात संचारबंदी आणि लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात जळगाव जिल्ह्यातील सर्व देशी /विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असूनही जिल्ह्यात काही ठिकाणी चोरी-छुपे दुकानं सुरु केली जात आहे. दरम्यान, अमळनेरात विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री करण्यात आल्याचे आ. अनिल पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अमळनेर शहरात तपासणी मोहीम हाती घेत अमळनेरात एकूण २५ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात १५ दुकानदाराविरुद्ध मद्य साठा तफावत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.  या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून जिल्हयातील ही मोठी साखळी असल्याचेही बोलले जात आहे.  जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पाहिल्यांदा एव्हढ्या मोठया प्रमाणात कारवाई होत असल्याने प्रशासनाचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

यांच्यावर झाली कारवाई
 नरेश लिकर्स, के. एस ललवाणी, सुनीता भरत ललवाणी, एच टिल्लूमल कंपनी. भरूच ब्रँडी हाऊस, हॉटेल न्यू योगेश, हॉटेल प्रतिभा, हॉटेल राजा गार्डन, हॉटेल साई प्रसाद, हॉटेल उदय, हॉटेल आराम, हॉटेल कुणाल, हॉटेल सम्राट, हॉटेल पायल, हॉटेल पूनम यांच्यावर कारवाई झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.