Monday, September 26, 2022

मद्यधुंद ट्रकचालकाची गाड्यांना धडक; 1 ठार तर 4 जखमी

- Advertisement -

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

नाशिक-पुणे रोडवर आंबेडकर नगर चौकात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने तीन ते चार वाहनांना धडक दिली. या भयावह अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

आज  सकाळच्या सुमारास आंबेडकर नगर चौकात नेहमीप्रमाणे नागरिक आपल्या दैनंदिन कामात होते. त्याचक्षणी एक भरधाव ट्रक आला आणि 3 ते 4 वाहनांना जोरात धडक दिली. ट्रकने ज्या वाहनांना धडक दिली त्यात 1 टुव्हीलर, रिक्षाचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तसेच रिक्षातील 3 ते 4 प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे मोठा गदारोळ माजला होता.

या घटनेनंतर मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवणा-या चालकाला तेथील स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आरोपी ट्रकचालक हा दारुच्या नशेत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या