मतमोजणीच्या दिवशी ‘फुल ड्राय डे’ला आव्हान; २४ रोजी सुनावणी

0

मुंबई ! लोकशाही न्युज नेटवर्क

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघात मतदानच्या दिवशी दारुबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे, मतदान होईपर्यंत मतदारसंघातील दारुची दुकाने, बार बंद ठेवण्यात आले. राज्यातील 48 मतदारसंघात 5 टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. तर, शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान झाले. त्यामध्ये, मुंबईसह परिसरातील 13 लोकसभा मतदाररसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात हे मतदान झाले. त्यामुळे, येथील वाईन शॉप, दारु दुकाने, पब बंद ठेवण्यात आले होते. आता, 4 जून रोजी मतमोजणी होत असून त्यादिवशीही दारु दुकाने, वाईन शॉप व पब बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी, दुकानमालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबईतील मतदान प्रक्रियेदरम्यान 20 मे च्या दोन दिवस आधीच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे, मुंबईत 3 दिवस दारु दुकाने बंद ठेवण्यात आली होता. याचा फटका विक्रेत्यांना बसल्याने आता 4 जून रोजीच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. विशेष म्हणजे न्यायालयानेही ही याचिका दाखल करुन घेतली आहे. पण, तत्काळ यावर निकाल दिला नसून 24 मे रोजी यावर सुनावणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.