मतदान करणाऱ्यांना मिळणार औषधांवर सूट

0

नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीत जास्तीत-जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. तसेच निवडणुकीला लक्षात घेत अनेक सामाजिक संस्थांने एक पाऊल पुढे उचलताना दिसत आहेत. दिल्लीनजीक नोएडामध्ये केमिस्ट असोसिएशननं मतदान करणाऱ्यांना औषधांवर १० टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी ही ऑफर देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान लवकरच सुरू होणार आहे. ७ टप्प्यात पार पडणाऱ्या मतदानात पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे. विविध संस्था, संघटना मतदार जागर करत आहेत. आता व्यापारी संघटनाही मतदार जागृतीसाठी पुढाकार घेत आहेत. मतदान करणाऱ्यांना औषधांवर १० टक्के सवलत देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनुप खन्ना यांनी केली. त्याचवेळी ‘दादी की रसोई’कडून मोफत जेवण देण्यात येणार आहे.

अनेक खासगी रुग्णालयांनीही मतदारांसाठी नव्या योजना सुरू केल्या आहेत. मतदान केल्यानंतर मोफत तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर काही रुग्णालयांनी रुग्ण तपासणी आणि उपचार खर्चात १० ते १५ टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे.

याआधी ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननंही मतदान करणाऱ्यांना पेट्रोल-डीझेलवर सूट देण्याची घोषणा केली होती. मतदान केल्यानंतर संबंधितांना प्रतिलिटर ५० पैसे सूट दिली जाणार आहे. प्रमोट मोहीमेत सहभागी झालेल्या पेट्रोल पंपांवर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.