मतदानाच्या टक्क्यात वाढ व्हावी याकरीता भुसावळ विभागातील अंगणवाडी सेविकांची सभा

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  भुसावळ विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय येथे (रामसिंग सुलाणे) निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार रोजी पंचायत समिती येथे ए.बा.वि.से. योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती रेखा गायकवाड यांनी कार्यक्षेत्रातील उपस्थित अंगणवाडी सेविकांची सभा घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपआपल्या क्षेत्रातील गरोदर माता, स्तनदा माता, नवविवाहीत महिला, वृध्द महिला यांना मतदान केंद्रावर पोहचविण्या बाबत मदत करावी, तसेच बी.एल.ओ. यांना मतदार चिठ्या वाटपाबाबत मदत करावी असे आवाहन केले.

या सभेस भुसावळ तालुक्यातील 184 अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. पर्यवेक्षीका श्रीमती जोशी,श्रीमती जाधव, श्रीमती वानखेडे यांनीदेखील मार्गदर्शन केले.तसेच नवीन प्रशासकीय इमारतीत 21 रोजी होणाऱ्या निवडणूक साठी चिन्हांकित मतदार यादीचे  छाननी चे काम करण्यात आले . यावेळी  रेखा गायकवाड बालविकास अधिकारी (प्रभारी) , जयश्री  जोशी पर्यवेक्षिका, शोभा जाधव,  रोझोतकेर दीपक  देवगिरे, ब्लॉक कॉर्डिनेटर आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.