चाळीसगाव –
झोनल अधिकार्यांनी मतदानाची माहिती अचूक भरावी, मतदान केंद्राध्यक्षांकडून मिळालेली माहिती अचूक व वेळेत भरावी, अशा सूचना तहसिलदार अमोल मोरे यांनी दिल्या.
मतदानाच्या दिवशी केंद्रनिहाय ऑनलाईन माहिती भरण्यासाठी झोनल अधिकार्यांना येथील नारायण बंकट वाचनालयात आज प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, निवासी नायब तहसिलदार नानासाहेब आगळे उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार यांनी सांगितले की, मतदानाच्या दिवशी व आदल्या दिवशी झोनल अधिकार्यांची भूमिका महत्वाची असते. त्यांच्या निवडणूक पथकांनी साहित्य ताब्यात घेतल्यापासून मतदान संपेपर्यंतची माहिती ुुु.ारहरशश्रशलींळेप.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावयाची आहे. यासाठी कोणतीही अडचण असल्यास ती सोडविण्यात येईल.
यावेळी विभागीय ट्रेनर व्ही. बी. शिंपी यांनी व त्यांचे सहकार्यांनी मतदानाच्या दिवशी मोकपोल घेणे, मतदानाची सुरुवात, दर दोन तासांची झालेल्या मतदानाची आकडेवारी, अंतिम आकडेवारी इत्यादी माहिती ऑनलाईन कशी भरावी याबाबत व्हिडीओ प्रोजेक्टरद्वारे डेमो दाखवून समजवून सांगितले. यावेळी मोबाईलवर ऑनलाईन डेमो माहिती भरतांना झोनल अधिकार्यांना आलेल्या अडचणींबाबत विभागीय ट्रेनर चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे सर्व झोनल अधिकारी व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.