आकाशवाणी पुणे परिवार, आकाशवाणी क्लबतर्फे महाराष्ट्रदिन, कामगारदिन कार्यक्रम
पुणे, दि.2 –
येथील आकाशवाणी पुणे परिवार, आकाशवाणी क्लबतर्फे महाराष्ट्रदिन, कामगारदिननिम्मित बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी काम करणार्या डोअर स्टेप स्कुलच्या सहकार्याने पालक आणि मुलांसाठी सदस्याचा स्नेहमेळावा आकशवाणी पुणे केंद्राच्या सभागृहात दि.1 रोजी आयोजित करण्यात आला होता. स्नेहमेळाव्यात 50 हून अधिक मुलांना रेडिओ संचाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला आकाशवाणी पुणे केंद्राचे उपमहानिदेशक आशीष भटनागर, उप संचालक गोपाळ औटी, डोअर स्टेपच्या संचालिका भावना कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी लैंप पोस्ट हा लघुपट मुलाना दाखवण्यात आला. प्रियांका म्हसके, संतोष सालुखे, रानी पाटिल, मेघराज मुलानी, राहुल हाळी, वैष्णवी रायकर, गौरी जोगदंड, पल्लवी साखरे यांनी डोअर स्टेप स्कुलच्या अनुभवा विषयी कथन केले.
यावेळी डोअर स्टेपच्या संचालिका भावना कुलकर्णी यांनी नैराश्यवर मात करत, सकारात्मकता बाळगा असा कान मंत्र मुलांना दिला. समाजात सगळीकडे अस्वस्था पसरलेली असताना डोअर स्टेप स्कुल करत असलेल्या कामाच कौतुक उपसंचालक गोपाळ औटी यांनी केले. यावेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे उप महानिदेशक आशीष भटनागर बोलतांना म्हणाले की, जगात इतिहास रचलेल्या महान व्यक्ति या विपरीत परिस्थितीतूनच उच्च पदापर्यन्त पोहचल्या तेंव्हा आत्मविश्वाास बाळगा आणि व्यसनापासून दूर रहा असा संदेश त्यांनी मुलांना दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मृदुला घोड़के यानीं केले.