एरंडोल | प्रतिनिधी
तालुक्यातील 24 नोव्हेंबर 20 पासून शासकीय ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे मात्र 16 डिसेंबर पासून मका व बाजरी या भरड धान्याची नोंदणी व मोजणी बंद करण्यात आली आहे वास्तविक शेतकर्यांकडे आजच्या घटकेला मका व बाजरी मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना शासनाने त्यांची खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आपला धान्य मातीमोल भावात खाजगी व्यापार्यांना विकावा लागत आहे.
एरंडोल तालुक्यात ऑर्बिट फॅक्टरीमध्ये शासनाचे ज्वारी मका खरेदी केंद्र झाले असून आतापर्यंत ज्वारी 6102 क्विंटल तर मका 9 नऊ हजार 263 क्विंटल खरेदी झालेली आहे बाजरी खरेदीसाठी 63 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे पण तिची खरेदी झालीच नाही शेतकऱ्यांकडे अजूनही मका व बाजरी मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे शासकीय खरेदी अभावी खाजगी व्यापारी मनमानी करित कमी भावात शेतकऱ्यांकडून मका व बाजरीची खरेदी करून घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे एकीकडे शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात जवळपास महिना झाले थंडीत आंदोलन करीत आहे त्यासंदर्भात केंद्रातील सध्याचे सरकार यांचेवर राज्यातील महा विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री व इतर मंत्रीगण टीकेची झोड उठवत आहे आपणच शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असा डांगोरा पिटत राजकारणाची पोळी भाजत आहे असे असताना राज्यातील महा विकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची बाजरी व मका खरेदी का करीत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे आतातरी राज्यातील सत्तारूढ सरकार राजकारणाचा डमरू बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तत्पर पावले उचलणार की नाही याची प्रतीक्षा केली जात आहे.