अमळनेर (प्रतिनिधी):-येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात दरवर्षी प्रमाणे २९ रोजी सायंकाळी श्री तुलसी विवाह महासोहळा व त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव अत्यंत पारंपरिक पद्धतीने विधिवत रित्या साजरा करण्यात आला.तत्पूर्वी मंदिरात श्री पालखी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विशेष महापुजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे हजारोंच्या संख्येने भाविकांना आमंत्रित न करता कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित ठेवण्यात आले होते.
खास या सोहळ्यासाठी भगवान विष्णू व माता तुळशीच्या अत्यंत मनोहारी नव्या मुर्त्या संस्थेने बनविल्या आहेत. तुळशीला साक्षात वधूराणीचे रूप देण्यात आले होते. अनेक भाविकांनी या मूर्त्यांसोबत फोटो व सेल्फीचा आनंद लुटला. फुलांचीही मनोहारी सजावट करण्यात आली होती. सर्वत्र सुंदर रांगोळ्या टाकल्या होत्या .सोहळ्याला येणाऱ्या सर्व पुरुष भाविकांना विशेष गंध व अत्तर तर मुली व महिलांना हळदी – कुंकू व अत्तर लावले जात होते.
सर्वत्र पाने,फुले,केळीचे खांब, दिवे आणि रोषणाईच्या माध्यमातून सजावट करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे विवाह सोहळ्याचे मुख्य यजमान होते. रविंद्र अहिरे,उद्योजक जितेंद्र झाबक, बिल्डर हेमंत पवार,शेखर धनगर,प्रशांत सिंघवी, लायन्स क्लबचे सेक्रेटरी विनोद अग्रवाल, साक्री पंचायत समितीचे माजी सभापती नितीन बेडसे, डी. ए. सोनवणे हे विवाह सोहळ्याच्या पूजेचे मानकरी होते.निवृत्त पर्यवेक्षक ए.पी. वाणी व जी.एस. हायस्कूल चे पर्यवेक्षक व्ही.व्ही.कुलकर्णी वर व वधू चे मामाच्या भूमिकेत होते.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,उपाध्यक्ष एस.एन.पाटील,सचिव एस.बी. बाविस्कर,सहसचिव दिलीप बहिरम,खजिनदार गिरीश कुलकर्णी,विश्वस्त अनिल अहिरराव,जयश्री साबे व सेवेकरी मंडळींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रसाद भंडारी,तुषार दीक्षित व जयेंद्र वैद्य यांनी पौरोहित्य केले.